गहाळ

डबड्यातील गोष्टी हरवल्या साऱ्या.
सर्व वस्तू.
ते पुस्तक, ती फाटकी डायरी
तो नकाशा
त्यावरल्या रंगीत शाईच्या
बिनधास्त उलट्या
प्रेमाची ती सांभाळलेली पत्रे
माझ्यासाठी थांबणारे
माझ्याचप्रमाणे तुटके ते घड्याळ
डोक्यावर कौलाचा इंच नसताना
घर बांधायची ती हिरवी चादर
आणि डबड्यातून किंचाळत असलेला
मी.