लोदी स्मशानात

लोदी स्मशानात
तिला दिलेला अग्नी

तिची मिठी
(पर्थिवालाही मिठी मारता येतं)

ही आग न विजवू शकणारा
बाहेर कोसळता पाऊस

"क्या करें, मॅडम, नसीब है"
रिक्षावाला ब्रेक मारता मारता म्हणाला
शंभर वेळा ऐकलेल्या या लाइनीतही सांत्वना शोधली की
मिळते
दिवाळीच्या लवंगीसारखी

बेटूशी भेट झाली त्याही अगोदर
तिने लिहिलेली जाहिरात वाचली

संगिनी सपोर्ट ग्रूप
भेट: दर शनिवारी दु. ३ ते सायं. ६
समलैंगिक व बाइसेक्शुअल महिलांकरिता

कालिन्याला थिसिस लिहिताना
जाहिरातही घोटली

बेटूशी ३-४ दा भेट
काही गप्पा
आता ही गोष्ट इथे खतम

अग्नी दिल्याबरोबरच भटजी बोलला
अर्ध्या तासात होईल सगळं
आता होतो पुढे

परतताना रिक्षावाल्याने रिक्षा
रिंग रोड जवळच्या पेट्रोल पंपाकडे थांबवली
गॅस भरता हूँ म्हणून गुटखा काढला
बाहेरच्या बेंचवर बसून वहीत काही लिहू लागले

गुटखा खात असलेला प्रेमळ रिक्षावाला

मी

माझ्याप्रमाणे थंडीच्या पावसात
निम्मी भिजलेली जुनी वही