आंधळं

प्रेम आंधळं असतं,
हो ना?

प्रेम जात नाही पाहत,
प्रेम धर्म नाही पाहत,
रंगांच्या होळीत अंध,
प्रेम मिसळून जातं.

प्रेम वय नाही पाहत,
प्रेम ओळख नाही बघत,

प्रेम अंत नाही मानत,
प्रेम विश्वात्मक असतं.

मग प्रेमाने लिंगच का पहावा?

तसं म्हटलं तर-
प्रेमानेच लिंग का पहावा?

मैत्री लिंग नाही पाहत,
आदर लिंग नाही पाहत
भक्ती तर अलैंगीच.

स्वाभिमान लिंग नाही पाहत.

उदारता, कनवाळूपणा
सत्य.

सर्व प्रेमाचीच रुपे नाहीत का?
मग प्रेमानेच लिंग का पहावा?

प्रेमाला अंध राहू द्या.
सत्याला, न्यायाला अंध राहू द्या.
पण तुम्ही डोळे उघडा.

द्वेषाच्या धुक्याला,
अज्ञानाच्या अंधकाराला,
तुम्हाला आंधळं करू देऊ नका.

प्रेम मुक्त करा.
द्वेषापासून मुक्त व्हा.

377 काढून टाका.

मिहीर भोसले

मिहीर भोसले हा मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत सिव्हिल अभियांत्रिकी शिकतो, आणि स्वतःचं वर्णन 'बहुस्वरूपी निराळा' असं करतो. तो प्रोफेशनल कवी, लेखक अथवा कलाकार नाही आहे, पण त्याला अधून-मधून रचनात्मकतेचे विनाक्रम झटके लागतात. ह्यांतून त्याला छान वाटणार्‍या गोष्टी तयार होतात.