काल तुला स्वप्नात पाहिलं

काल तुला स्वप्नात पाहिलं,
जुन्या दिवसांतल्या एका क्षणात तुला जगलं.
तुझा हात तसाच माझ्या खांद्यावर,
आणि माझा कान तुझ्या हॄदयाच्या ठोक्यांवर.
तेव्हाही तोच विचार मनात,
काल स्वप्नातही तोच.
बहात्तर ठोक्यांमधला कोणता माझ्यासाठी?
वेड्यासारखे माझे विचार
आणि वेड्यासारखा मी.
तू माझाच असणार अगदी शेवटपर्यन्त
असाच जगायचो मी.
अचानक काल स्वप्नात तू काही वेगळाच वागलास,
खांद्यावरचा हात तू माझ्या छातीवर आणलास.
थोडा वेळ गप राहिलास आणि मग म्हणालास
‘ही एवढी धडधड कोणासाठी?’
मी लगेच म्हटलं. तुझ्यासाठी.
स्वप्नात तू हसलास आणि माझ्या वेडेपणाला,
शहाणं करून निजलास.
आज सकाळी उठलो तर “स्वप्नातला तो तू” समजलास
माझ्या बाजूला आजचा हा कोणी दुसराच.
आज मी शहाण्यासारखाच वागतो,
कारण वेडेपणा तुझ्याबरोबरच आयुष्यातून हरवला.
कधी कधी पुन्हा वेडे व्हावेसे वाटते.
त्या बहात्तर ठोक्यं ठोक्यांपैकी किती माझ्यासाठी होते,
ते शोधावेसे वाटते.

23 जानेवरी 2015
11:55 ए एम