सिद्धांत

माझं नाव सिध्दांत… सिध्दांत मोरे. मी दुसऱ्या कुठल्याही साधारण मुलासारखा... except की मी transgender आहे. हो! माझा जन्म एक मुलगी म्हणून झाला, लहानपणापासून मी खूप uncomfortable होतो माझ्या शरीराबद्दल. आणि असं वाटायचं की मी जो आहे तो मी नाही. पाचवी पासून मुलींसाठी आकर्षण उत्पन्न झालं. वाटलं मी समलैंगिक आहे, तिसाव्या वर्षापर्यंत मला तेच वाटत राहिले आणि मग २००८ मध्ये माझी मैत्री एका transman शी झाली. इतक्या वर्षाची मनाची घालमेल शांत झाली. मनात खूप होतं की transition करावं पण घरच्या जबाबदाऱ्या होत्या. आईच्या तब्येत बरी नसल्यामुळे आणि ती माझ्या वर emotionally आणि physically dependent असल्यामुळे मी transition चा विचार सोडून दिला. दिवसेंदिवस आईची तब्येत अजून खालावत चालली होती. २०११ मध्ये दुर्देवाने ती देवाघरी गेली आणि एका वर्षांनी मी निर्णय घेतला transition चा. सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय, माझ्या आयुष्याचा. Life changing decision म्हणतात तसे. एवढा मोठा risk घ्यायची कुठून ताकद आली कुणास ठाउक. मे २०१२ मध्ये मी होर्मोनेस replacement Therapy सुरु केली . २०१३ मध्ये Sex Reassignment Surgery केली. आता मला असं वाटतं की माझा नुकताच जन्म झाला अहे. इतके वर्ष मला कुणाच्या दुसर्‍याच्या शरीरात ठेवलय असे वाटत होतं . आता मला free bird सारखे वाटतंय . हे सगळे एकट्याने शक्य नव्हते. मला माझ्या जवळच्या मित्रांचा, आणि communityचा खूप आधार मिळाला. transition एवढे सोपे नव्हते. एका नवीन जीवनात प्रवेश करण्यासारखे होते. खूप stressful आणि challenging आहे पण लढण्याची जिद्द आणि संयम असला तर सगळे शक्य आहे असा मला वाटतं . ही तर सुरुवात आहे, आयुष्यात अजून खूप लढा बाकी आहे माझ्या …. पण मी तयार आहे …. लढायलाआणि जिंकायला सुद्धा….

सिध्दांत मोरे